
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. केरळ ते जम्मू काश्मिरनंतर आता या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. सध्या ही यात्रा बिहारमधून प्रवास करतेय.

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी स्थानिकांशी संवाद साधत आहेत. बिहारमधील शेतकरी बांधवांशी त्यांनी संवाद साधला.

बिहारच्या पूर्णियातील शेतकऱ्यांशी त्यांनी बातचित केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेती करताना येणाऱ्या अडचणींवरही त्यांनी चर्चा केली.

शेतात राबणाऱ्या भगिनींशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. शेतीचं होणारं नुकसान आणि शेतीचं उत्पन्न यावर त्यांनी चर्चा केली. शेतकरी महिलेशी चर्चा करताना राहुल गांधी...

यावेळी राहुल गांधी यांनी शेतात बाजावर बसून शेतकऱ्यांच्या सोबत जेवण केलं. शेतकऱ्याच्या घरातील साध्या जेवण्याचा त्यांनी आस्वाद घेतला.