
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या आसाम राज्यात आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेशी संवाद साधताना... स्थानिकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी राहुल गांधी... भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममधून प्रवास करते आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ही यात्रा काढली आहे. राहुल गांधी या यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधतात. ही खास फ्रेम राहुल गांधी यांच्या समर्थकाने भेट दिली.

भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने मणिपूर जळालं गेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापपर्यंत मणिपूरमध्ये गेले नाहीत. यामुळे मणिपूरमध्ये सुरु झालेली ही यात्रा महाराष्ट्रापर्यंत जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.

"ये देश मोहब्बत का देश है! प्रेमानेच आपला देश पुढे जाईल. हिंसा आणि द्वेषाने काहीही होणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रे दरम्यान, ते आसाममध्ये बोलत होते.