
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अशातच काँग्रेसने एक महत्वाचं ट्विट केलं आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांचे हात उंचावतानाचा फोटो शेअर केलं आहे.

आमच्यात काहीही वाद नाहीत. आम्ही एक आहोत, असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे.

सिद्धरामय्या यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्याचा फोटो काँग्रेसच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

डी. के. शिवकुमार यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली. तेव्हा पुष्पगुच्छ देतानाचा फोटो काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे.