राज ठाकरे माझ्या घरी चहाला आले तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस असेल : चंद्रकांत पाटील

| Updated on: Aug 06, 2021 | 3:32 PM

1 / 5
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचं चंद्रकांत पाटलांनी मान्य केलं मात्र, आगामी निवडणुकीबाबत युतीसाठी कसलाही प्रस्ताव दिला नसल्याचंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

2 / 5
चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे भेट- संग्रहित फोटो

3 / 5
कुठलीही दोन महाराष्ट्रातील हिंदू माणसं भेटतात, तेव्हा निघाताना पुन्हा या असं सांगणं असतंच. या पुन्हा भेटीला राजकीय संदर्भ नाही. विशेषता वहिनी जेव्हा आल्या त्या म्हणाल्या पुढल्यावेळी पत्नीला घेऊन या. त्यावर मी त्यांना सांगितलं इथून 50 पावलांवर पत्नीचं ऑफिस आहे. त्याही येतील, असं सांगतानाच राज ठाकरे माझ्या घरी चहा प्यायला आले तर मला आनंदच होईल, असंही ते म्हणाले.

4 / 5
यावेळी राज ठाकरेंना आपण चहासाठी घरी येण्याचं निमंत्रण दिलं असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. राज ठाकरे माझ्या घरी चहासाठी आले तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस असेल असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

5 / 5
राज ठाकरेंसोबतच्या भेटीत परप्रांतियांच्या बाबतीत चर्चा झाल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. राज यांनी परप्रांतियांबद्दची भूमिका बदलल्याशिवाय युतीची चर्चा होणार नाही, असं मी सांगितलं होतं. त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली. मी ते ऐकलं. त्यावरून आमच्यात आता चर्चा झाली, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.