
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. कालपासून या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला सुरुवात झाली आहे.

मणिपूरची राजधानी इंफाळमधून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. येत्या 20 मार्च मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे.

या 66 दिवसांच्या कालावधीत 'भारत जोडो न्याय यात्रा' 15 राज्यातून जाणार आहे. या दरम्यानच्या काळात राहुल गांधी स्थानिक जनतेशी संवाद साधणार आहे.

राहुल गांधी सध्या स्थानिकांना भेटत आहेत. त्यांच्या संवाद साधत आहेत. समस्या जाणून घेत आहेत.

राहुल गांधी यांनी मणिपूरमधील चिमुकल्यांशी संवाद साधला. या चिमुकल्यांनी राहुल गांधी यांना फुलं दिली. या भेटीचा हा खास फोटो...