
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना श्री विठ्ठलाची सेवाकरण्याचा मान 4 वेळा मिळाला.

1995 ते 1999 या काळातील मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी कार्यकाळमध्ये त्यांना श्री विठ्ठलाची सेवाकरण्याचा मान मिळाला होता.

माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना देखील त्यांच्या कार्यकाळात श्री विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळला.

जेव्हा गोष्ट विठ्ठल पूजेची येते तेव्हा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव ठळकपणे समोर येते. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना हा मान सहा वेळा मिळाला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळमध्ये त्यांना विठ्ठलाची सेवाकरण्याचा मान 4 वेळा मिळाला. 2018 ला मराठा आंदोलन असल्याने देवेंद्र फडणवीस यांना आंदोलनामुळे फडणवीसांना पंढरपूरला जाता आले नव्हते. त्यावेळी त्यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावरच विठ्ठलाची मुर्ती चौरंगावर मांडून पुजा केली.सोशल मिडीयावर याबाबत उलटसुलट चर्चा झाली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यांसोबत तुफान पावसात पंढरपूरला स्वत: गाडी चालवत रवाना झाले होते.

यावर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोंडिबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाइ टोणगे यांना मिळाला.

तर पी.के.सावंत, वसंतदादा पाटील, बॅ.ए.आर अंतुले,सुधारकर नाईक आणि बाबासाहेब भोसले यांना मात्र मुख्यमंत्री असताना एकदाही पुजेची संधी मिळाल्याचा उल्लेख नाही.