AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Drought: राज्यात 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना नेमक्या सवलती काय? वाचा संपूर्ण उपाय योजन

Maharashtra Drought: कोरड्या दुष्काळाच्या परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

Maharashtra Drought: राज्यात 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना नेमक्या सवलती काय? वाचा संपूर्ण उपाय योजन
Maharashtra DroughtImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 2:39 PM
Share

पावसाने दांडी मारल्यामुळे राज्यात दुष्काळ पडला आहे. यवतमाळ येथे दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी. पालकमंत्री संजय राठोड यांच्या निर्देशनात जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग यांनी शासनाला सादर केलेल्या कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांचा Trigger-1 (प्रथम कळ) मध्ये समावेश करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार Trigger-1 लागू असलेल्या राज्यातील 265 तालुक्यांसाठी विशेष बाब म्हणून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व 16 तालुके :

यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यात दुष्काळ घोषीत केला आहे. त्यामध्ये यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी आणि राळेगाव या तालुक्यांचा समावेश आहे.

लागू करण्यात आलेल्या प्रमुख 12 उपाययोजना व सवलती :

1. जमीन महसुलात सूट

2. पीक कर्जाचे पुनर्गठन

3. शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती

4. कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट

5. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

6. रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे

7. आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर

8. टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे

9. शेतीवर अवलंबून शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची व्यवस्था

10. जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची व्यवस्था

11. जलसंधारणाची कामे सुरू करणे

12. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाण्याचे नियोजन

पीक नुकसानीची आर्थिक मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे.

कोरड्या दुष्काळाच्या परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन