AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Kambli Video: विनोद कांबळी यांची बिकट अवस्था, बायकोने.. तो व्हिडीओ बघताच चाहत्यांच्या डोळ्यात पाणी

Vinod Kambli: विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ते वृद्धाश्रमात दाखल झाले असून त्यांनी एक व्हि़डिओ शेअर केला आहे.

Vinod Kambli Video: विनोद कांबळी यांची बिकट अवस्था, बायकोने.. तो व्हिडीओ बघताच चाहत्यांच्या डोळ्यात पाणी
| Updated on: Sep 26, 2026 | 2:29 PM
Share

सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आणि माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा त्याच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. त्याने एका वृद्धाश्रमातून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला वृद्धाश्रमात पाहून चाहते त्याच्याबद्दल चिंतीत आहेत. मात्र, या व्हिडिओमध्ये हा माजी क्रिकेटपटू केंद्रातील सुविधांची प्रशंसा करताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “मी विनोद कांबळी आहे, आणि मी कुठे आहे? मी कुठे आहे? मी निदानमध्ये आहे. आणि मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की, मला निदानमध्ये खूप चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत. आणि मला हेही सांगावेसे वाटते की, येथील स्वच्छता वगैरे अगदी फर्स्ट-क्लास आहे.” कांबळी बोलताना अडखळतो, ज्यामुळे चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबद्दल काळजी वाटू लागली आहे.

विनोद कांबळी पुढे म्हणाला, “मी माझ्या घरीच राहतोय असं वाटलं मला आणि मला इथल्या प्रत्येकाकडून खूप प्रेम मिळालं आहे. मी लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानतो असं म्हणत व्हिडिओ संपवला आहे. पण चाहत्यांना एक गोष्ट खटकली आहे. एक गोष्ट चाहत्यांच्या लक्षात आली ती म्हणजे विनोद कांबळींची परिस्थिती इतकी बिकट असूनही त्यांच्यासोबत एकही कुटुंबाचा सदस्य नव्हता. त्यामुळे चाहते बायकोने पाठ पिरवली असल्याचा संशय व्यक्त करत आहे.

विनोद कांबळी यांची क्रिकेट कारकीर्द विनोद कांबळी, ज्यांनी १९९१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, ते १२१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यांनी १७ कसोटी सामन्यांमध्ये ५४.२० च्या सरासरीने १०८४ धावा केल्या. त्यांनी ४ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली. त्यांची सर्वोच्च कसोटी धावसंख्या २२७ होती, जी त्यांनी दिल्लीत झिम्बाब्वेविरुद्ध केली होती.

विनोद कांबळी १०४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्यांनी ३२.५९ च्या सरासरीने २४७७ धावा केल्या. त्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये २ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली. कांबळी यांनी १२९ प्रथम-श्रेणी सामन्यांच्या १८१ डावांमध्ये ९९६५ धावा केल्या. त्यांनी २२१ लिस्ट ए सामन्यांमध्ये ६४७६ धावा केल्या, ज्यात त्यांनी ११ शतके आणि ३५ अर्धशतके झळकावली.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन