मोठी बातमी! अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणात चार्जशीट दाखल, चंपत राय यांना मोठा दिलासा?
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. मात्र या चार्जशीटमध्ये चंपतराय यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. हा चंपतराय यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. मात्र या चार्जशीटमध्ये चंपत राय यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. हा चंपत राय यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. अयोध्या येथील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांना पोलिसांनी आणि विशेष तपास पथकाने (SIT) क्लीन चीट दिली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात त्यांना आरोपी न बनवता सरकारी साक्षीदार म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या एसआयटीने (SIT) अयोध्येतील भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयात सुमारे ६०,००० ते ७०,००० पानांचे विस्तृत आरोपपत्र दाखल केले आहे. चंपत राय यांच्यासोबतच ट्रस्टचे माजी सदस्य डॉ. अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांनाही या प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. त्यांच्याविरोधात चोरीमध्ये थेट किंवा अप्रत्यक्ष सहभागाचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
8 जणांवर कारवाई
या देणगी चोरी प्रकरणात मंदिरातील मोजणी प्रक्रियेदरम्यान नोटांचे बंडल आणि देणगी लपवून चोरी करणाऱ्या एकूण 8 कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आलं आहे. चोरीची रक्कम देखील हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून सुमारे ७९ लाख ८५ हजार रुपये रोख रकम्म जप्त केली असून, त्यांच्या बँक खात्यांमध्ये ९८ लाख ३० हजार रुपये जमा असल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२६ मध्ये एसआयटीने आपला अंतिम अहवाल गृहविभागामार्फत राम मंदिर ट्रस्टकडे सोपवला होता, ज्यामध्ये चंपत राय यांच्यावर केवळ प्रशासकीय देखरेखीची कमतरता असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता, मात्र चोरीत कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता अधिकृत चार्जशीटद्वारे त्यांना पूर्णपणे दोषमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे चंपत राय यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
