AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारात छोट्या कारची मागणी वाढली, अचानक ट्रेंड कसा बदलला? कारण काय?

बाजारात छोट्या कारची मागणी वाढल्याचे दिसत आहे. छोट्या कार खरेदीला पंसती दिली जाऊ लागली आहे. अचानक ट्रेंड का बदलला, जाणून घ्या

बाजारात छोट्या कारची मागणी वाढली, अचानक ट्रेंड कसा बदलला? कारण काय?
Small carImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 2:55 PM
Share

धावपळीच्या जीवनात आता खासगी कारचा वापर वाढला आहे. आता रस्त्यावर खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. अनेक नोकरदार खासगी दुचाकी आणि चारचाकीला पंसती देतात. एकेकाळी बाजारात एसयूव्ही कारची क्रेझ होती. परंतु बाजारात जुना ट्रेंड बदलला आहे. आता ग्राहक वर्ग छोट्या कार खरेदीकडे वळला आहे. नेमका ट्रेंड कसा बदलला? जाणून घ्या.

आताच्या महागाईच्या काळात प्रत्येक वस्तू महाग होऊ लागल्या आहेत. कारच्या किंमती देखील भरमसाट वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहक कमी किंमतीच्या आणि जास्त वेळ टिकणाऱ्या कार खरेदीवर भर देऊ लागले आहेत. कार खरेदी करताना इंधनाच्या दराचा देखील विचार करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने कारच्या मायलेजचा विचार केला जात आहे. छोट्या कारसाठी इंधन कमी लागते. त्यामुळे सध्याच्या घडीला छोट्या कारला पसंती दिली जात आहे.

ग्राहक आता कार खरेदी करताना किंमतीसह महिन्याला लागणााऱ्या इंधनाचा देखील विचार करू लागले आहेत. नोकरीसाठी दूरचा प्रवास करणारे आता इंधनाचा विचार करू लागले आहेत. यात आणखी महत्वाची बाब म्हणजे पार्किंगची समस्या. घर, ऑफिस, बाजार किंवा मॉलजवळ पार्किंगला पुरेसी जागा नसते. परंतु छोट्या कारला पार्किंगसाठी जागा मिळते. अरुंद गल्ली , रस्त्यावरून छोटी कार चालवणे सोपे जाते. शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे आता वाहतूक कोंडीची समस्या अधिक जाणवू लागली आहे. छोट्या गाड्या अरुंद जागेतून पटकन वळवता येतात. गर्दीतूनही चालवणे सोपे जाते. त्यामुळे आता ग्राहक छोट्या कारला पसंती देऊ लागली आहेत.

मोठ्या प्रमाणात छोट्या कारला पसंती दिली जात आहे, याचा अर्थ मोठ्या कारची खरेदी बंद झाली, असं म्हणता येणार नाही. बाजारात कारची किंमत, फिचर्स , मायलेज, डिझाइन, ग्राहकांच्या गरजांवर सर्व काही अवलंबून असते. काही भागात मोठ्या कारची खरेदी कमी झाली असली, तरी मोठ्या कारची बाजारपेठ पूर्णपणे नाहीशाी झाली असे म्हणता येणार नाही. मोठ्या कार खरेदी करणारा ग्राहक वर्ग देखील आहे. प्रत्येक ग्राहक स्वत:च्या सोयीनुसार कारची खरेदी करत असतात. वेळोवेळी ट्रेंडमध्ये बदल देखील पाहायला मिळतो.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन