
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतापलेला असताना या हल्ल्याचा बदला घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असा उघड इशाराच दिला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते तथा आमदार संजय गायकवाड यांनी नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे.

काँग्रेस आणि भाजपा सरकारमध्ये प्रचंड फरक आहे. मोदी यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. पण इस्रायलच्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीने कारवाई केली त्या पद्धतीने आपल्याकडे काम होताना दिसत नाही, अशी खंत संजय गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.

जसे जखमेवरचे रक्त सांडल्यानंतर रोज ड्रेसिंग होते तसे पाकिस्तान आणि बांगलादेशचे झाले आहे. त्यामुळे याला कायमचं ड्रेसिंग झालं पाहिजे. त्याशिवाय हे थांबू शकत नाही, असं मत संजय कायकवाड यांनी व्यक्त केलंय.

पंतप्रधान यांनी खामकी भूमिका घेतली पाहिजे. कुणाला विचारायची गरज काय. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे. देश दिला आहे. धडाक्यात निर्णय घ्या, अशी मागणीच संजय गायकवाड यांनी मोदींना उद्देशून केली आहे.

संजय गायकवाड