
मुंबईमध्ये स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर रविवारी या स्वच्छता मोहिमेची पाहणी करतात. आजही वरळीत जात शिंदेंनी या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. रस्त्यावर पाणी फवारत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी मंत्री दीपक केसरकरही त्यांच्यासोबत होते.

कधी रस्ते धुताना पाहिले होते का? पहिले पूर्वी फार पूर्वी रस्ते धुतले जायचे .... आता एक दिवसाआड रस्ते धुतले जाणार आहेत. तशी यंत्रणा आपल्याला लावायची आहे. ती यंत्रणा लावण्याचं काम सध्या सुरू आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने मुंबई सेंटरच्या बेलासीक रोडचीही पाहणी केली. रस्त्याच्या कडेला असलेले फुटपाथ आणि डिव्हायडरच्या रंगरंगोटीच्या कामाची ही पाहाणी करत काम व्यवस्थित करण्याच्या कर्मचाऱ्यांना शिंदेंनी सूचना दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळपासून अजित पवारांकडून बारामती शहरातील अनेक विकास कामांची पाहणी केली. आज दिवसभरात बारामती शहरात अजित पवार यांचे अनेक कार्यक्रम आहेत.

बारामती शहरातील कामांच्या पाहणीनंतर अजित पवार जनता दरबार घेणार आहेत. दुपारी बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचाचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार होणार आहे.