
लोकसभा निवडणुकी आता रंग चढू लागला आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

केरळच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यादेखील उपस्थित होत्या.

वायनाड मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या संपत्तीबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची संपत्ती 20 कोटी रुपये इतकी आहे.

राहुल यांच्याकडे 55 हजार रोख रक्कम आहे. 26 लाखांची बँक डिपॉझिट आहेत. तर शेअर बाजारात सव्वा 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी