
देशाच्या नव्या संसद भवनाचं आज उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

यावेळी नव्या संसदेबाहेर उपस्थित नेत्यांनी फोटो काढला. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पियूष गोयल यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. "नव्या संसद भवनासमोर... उद्घाटनातच्या या कार्यक्रमाला राहता आलं याचा आनंद आहे", असं फडणवीस म्हणाले.

तसंच आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यालाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. अभिवादन केलं.

महाराष्ट्र भवनातील या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील तसंच भाजप आणि शिवसेनेचे खासदारही हजर होते.