PHOTO: भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा थाटात, दिग्गज राजकीय नेते अन् कलाकारांची उपस्थिती

PHOTO: भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीचा  विवाहसोहळा थाटात, दिग्गज राजकीय नेते अन् कलाकारांची उपस्थिती
संगीत रजनी समारंभागीत दृश्यं

. प्रसाद लाड यांची कन्या सायली आणि शांतनू यांचा विवाह सोहळा दिमाखात पार पडला असून भाजप, शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री, नेते एवढंच नाही तर अनेक सेलिब्रेटिंनीदेखील लग्नाला हजेरी लावली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 21, 2022 | 1:56 PM

मुंबईः भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला केंद्रीय आणि राज्याच्या राजकारणातल्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. प्रसाद लाड यांची कन्या सायली आणि शांतनू यांचा विवाह सोहळा दिमाखात पार पडला असून भाजप, शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री, नेते एवढंच नाही तर अनेक सेलिब्रेटिंनीदेखील लग्नाला हजेरी लावली.

Devendra Fadanvis

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती. या समारंभात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार प्रितम मुंडे, खासदार मनोज कोटक आदींनी उपस्थिती लावली.

Sanjay Raut in wedding

प्रसाद लाड यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांची उपस्थिती

Prasad lad daughter wedding

नरेंद्र पाटील, कृपा शंकर सिंह, माजी खासदार निलेश राणे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ, आमदार निरंजन डावखरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनेत्री रेणुका शहाणे आदींनी या लग्नाला हजेरी लावली.

Chandrakant Patil

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती

Ramdas Athavle in Wedding

सायली व शांतनूच्या विवाह सोहळ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचीही उपस्थिती

Prasad lad daughter wedding

मुलीच्या लग्नात हळव्या झालेल्या प्रसाद लाड यांचा हा फोटो भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें