
केंद्र सरकारने कांद्या निर्यातीवर 40 % कर लावला आहे. त्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.

केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहे. पुण्यातील आळेफाट्यावरही आज शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन करत आहेत.

शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. या आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरीही या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले. यावेळी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

अमोल कोल्हे यांनी यावेळी आक्रमक झाले. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा आहे. सरकारने पुन्हा एकदा या निर्णयाचा विचार करावा, असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.