
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुरु केलेली युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या, युवकांच्या प्रश्नांसाठी ही यात्रा काढत असल्याचं रोहित पवार म्हणाले. या पदयात्रेत रोहित पवार सामान्य लोकांशी संवाद साधत आहेत.

या पदयात्रेतील आजच्या दिवसाची सुरुवात रोहित पवार यांनी व्यायाम करत केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही होते.

तळेगाव ढमढेरे इथं मेंढपाळ बांधवांसोबत रोहित पवार यांनी चर्चा केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी समर्थन दिलं आहे. समर्थनार्थ रोहित पवार उद्या एक दिवस अन्नत्याग करणार आहेत.

तळेगाव ढमढेरे इथल्या माळवाडीमधील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी भेट घेतली. त्यांच्याशी बातचित केली.