
200 युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याची घोषणा काँग्रेसने केली होती. त्याची अंमबजावणी आजपासून केली जाईल, असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.

गरीब कुटुंबाची प्रमुख जर महिला असेल तर त्या कुटुंबाला 2 हजार देण्याबाबत काँग्रेसने सांगितलं आहे.

महिलांना मोफत प्रवास देण्याबाबतही काँग्रेसने शब्द दिला होता. त्याची आता अंमलबजावणी केली जाणार आहे.

बेरोजगार तरूणांना दोन वर्षे सरकारी भत्ता दिला जाणार आहे. पदवीधारकाला 3 हजार आणि डिप्लोमा झालेला असेल तर दीड हजार प्रतिमहिना याप्रमाणे पैसे मिळणार आहेत.

बीपीएल कार्डधारक कुटुंबांना दहा किलो तांदुळ मोफत दिला जाणार आहे. या पाच योजनांची आजपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.