
दुपारी चार वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर सेना भवनात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येनं शिवसेना कार्यकर्ते या पत्रकार परिषदेसाठी सेना भवनात हजर राहण्याची शक्यता आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांना संजय राऊत यांची पत्रकार परिषद पाहता यावी, यासाठी शिवसेना भवनाबाहेर एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे.

फक्त शिवसेना भवनाच्या बाहेरच नाही, तर शिवसेना भवनाच्या आतमध्येही एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.

Shivsena Press Conference

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सेना भवनाला सकाळपासूनच छावणीचं रुप आलंय.

सेनाभवनातील पत्रकार परिषदेचा लाईव्ह टेलिकास्ट या एलईडी स्क्रिनवरुन करण्यात येणार आहेत.

दुपारी चार वाजता संजय राऊत नेमकं शिवसेना भवनातून काय गौप्यस्फोट करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

संपूर्ण राज्याची नजर आज शिवेसना भवनाच्या पत्रकार परिषदेकडे लागलंय. सकाळापासून शिवसेना कार्यकर्त्यांची लगबग सेनाभवन परिसरात दिसून आली आहे.