
बारामतीतील काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने भाऊबीजेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवार व त्यांचे बंधू प्रतापराव पवार यांना त्यांच्या भगिनीने ओवाळले.

खासदार सुप्रिया सुळेसह इतर बहिणींनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना औक्षण करून भाऊबीज साजरी केली.

औक्षणानंतर अजित पवारांनी आपल्या सर्व भगिनींसह एकत्रित फोटो सेशनही केले.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनाही त्यांच्या सर्व भगिनींनी ओवाळत भाऊबीज साजरी केली.

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनाही औक्षण करण्यात आले.

दिवाळीचे औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व पवार कटुंबीय एकत्र जमले होते. यावेळी एकत्रित फोटो सेशनही करण्यात आले.