
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. त्यांच्या अटकेचा आदेश टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे.

प्रीवेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग एक्ट 2002च्या अंतर्गत नवाब मलिक यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

बुधवारी (23 फेब्रुवारी, 2022) दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

वयाच्या 62 व्या वर्षी नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली असून त्यांच्यावर गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला असल्याचं सांगितलं जातंय.

ईडीचे अधिकारी नीरज कुमार यांनी याबाबतचा आदेश जारी केली असून नवाब मलिकांच्या अटकेच्या कारवाईनंतर राजकीय घडामोडींनी वेग आला आहे.