
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ स्कॉटलंडला फिरायला गेले होते. त्यांच्यानंतर आता भाजपचे आणखी एक नेते पर्यटनासाठी गेले आहेत.

भाजपचे नेते योगेश टिळेकर हे सध्या केरळमध्ये फिरण्यासाठी गेले आहेत. तिथले काही फोटो शेअर केलेत.

योगेश टिळेकर सध्या केरळच्या काही भागात सहकुटुंब पर्यटन करत आहेत. त्याचेच काही फोटो...

"कुटुंबीयांसोबत निसर्गरम्य केरळला भेट! केरळ, आदी शंकराचार्यांची ही जन्मभूमी आहे. निसर्गाने नटलेली ही पवित्र भूमी अप्रमित आहे. राजकारणाच्या धकाधकीतून जरा दोन निवांत क्षण कुटुंबासमवेत घालवण्यासाठी मी सहकुटुंब केरळला आलो आहे. मुनार, टेकडी आणि कोचीनचं सौंदर्य अद्वितीय आहे", असं कॅप्शन योगेश टिळेकर यांनी आपल्या फोटोना दिलं आहे.

"आलेप्पी किंवा आलप्पूझा हा केरळ मधिल लोकप्रिय समुद्र किनारा... एक आनंददायी अनुभव देणारी हाऊसबोट यात्रा... याच बोट मध्ये हॉटेलची सुद्धा वेवस्था असते. निसर्गाचा हा अनुभव घेताना काही निवांत क्षण...", असं कॅप्शन देत टिळेकर यांनी समुद्रकिनाऱ्यावरचे फोटो शेअर केलेत.