भारतातील श्रीमंतापेक्षा विकसित देशातील गरीब अधिक धनवान; महिन्याला पगार किती? आकडा वाचून झोप उडेल

भारतातील श्रीमंतापेक्षा विकसित देशातील गरिबांची कमाई अधिक आहे. विकसित देशातील गरीब व्यक्ती दिवसाला किती खर्च करतो, जाणून घ्या.

| Updated on: Oct 12, 2026 | 8:07 PM
1 / 5
विकसित देशातील 10 टक्के गरीब लोकांची लाईफस्टाइल आणि मासिक उत्पन्न हे भारतातील 10 श्रीमंत लोकांपेक्षा अनेक पट चांगलं आहे. वर्ल्ड बँकेच्या पॉवर्टी अँड इनइक्विलिटी प्लॅटफॉर्म' रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विकसित देशातील 10 टक्के गरीब लोकांची लाईफस्टाइल आणि मासिक उत्पन्न हे भारतातील 10 श्रीमंत लोकांपेक्षा अनेक पट चांगलं आहे. वर्ल्ड बँकेच्या पॉवर्टी अँड इनइक्विलिटी प्लॅटफॉर्म' रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

2 / 5

भारतातील काही कुटुंब श्रीमंताच्या यादीत मोडले जातात, त्यांचा दररोजचा खर्च हा विकसित देशातील गरीब लोकांपेक्षा कमी आहे. वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, अनेक देशात सर्वात गरीब आणि श्रीमंताच्या कमाईत फरक दिसून आला.

3 / 5

भारतात दहा टक्के गरीब लोकांच्या दररोजचा खर्च हा प्रति व्यक्ती तीन डॉलर इतका आहे. तर अमेरिकेसारख्या विकसित देशातील दहा टक्के गरीब लोकांचा खर्च हा 25 डॉलर इतका आहे. तर कॅनडामध्ये हा आकडा 31 डॉलर इतका आहे . ऑस्ट्रेलियात दिवसाचा खर्च 28 डॉलर इतका आहे.

4 / 5

भारतात श्रीमंत व्यक्तीचा दररोजचा खर्च हा 10 डॉलर इतका आहे. भारताच्या इकॉनॉमिक सर्व्हेच्या माहितीनुसार, जर एखादा व्यक्ती महिन्याला 80000 रुपये कमावतो. तर त्याचा समावेश हा देशातील सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या दहा टक्क्यांमध्ये गणली जाते.

5 / 5

या तुलनेत अमेरिकेत सर्वात श्रीमंत 10 टक्के दररोजचा खर्च हा 173 डॉलर, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये 129 डॉलर, तर जर्मनीत 128 डॉलर इतका आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे की, भारतात दिवसाला 10 डॉलर खर्च करणारी व्यक्ती सर्वाधिक श्रीमंताच्या 10 टक्क्यांमध्ये होते. तर कॅनडा, जपान आणि अमेरिसारख्या देशा हीच आकडेवारी सर्वात गरीब 10 टक्क्यांमध्ये येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us