लोकप्रिय मराठी मालिकेनं रचला इतिहास; थेट गाठलं न्यूयॉर्कचं टाईम्स स्क्वेअर

ही संपूर्ण मोहीम म्हणजे संस्कृती, खेळ, परंपरा यांचा सुरेख संगम आहे. कमळीचा प्रोमो टाईम्स स्क्वेअरसारख्या जागतिक स्तरावर झळकणं हा मराठी अस्मितेचा जगभरात झालेला सन्मान आहे. ही मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Sep 29, 2025 | 11:51 AM
1 / 5
मराठी टेलिव्हिजनसाठी हा दिवस अभिमानास्पद आहे, कारण झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’चा कबड्डी विशेष प्रोमो थेट अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे. यामुळे कमळी ही टाईम्स स्क्वेअरवर झळकणारी पहिली मराठी मालिका ठरली आहे.

2 / 5
महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ कबड्डी आणि मराठी संस्कृती यांचा जागतिक व्यासपीठावर गौरव झाला आहे. कबड्डी हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. ताकद, चातुर्य आणि संघभावना दर्शवणारा हा खेळ ‘कमळी’ मालिकेत प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे.

3 / 5
या विशेष भागात टीम कमळी (विजया बाबर) आणि टीम अनिका (केतकी कुलकर्णी) यांच्यातील थरारक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या ऐतिहासिक क्षणाबद्दल कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबरने आनंद व्यक्त केला आहे.

4 / 5
"‘कमळी’ माझ्यासाठी केवळ एक भूमिका नाही, तर ती माझ्या आयुष्यातील एक प्रेरणादायी प्रवास आहे. एका सामान्य गावाकडच्या मुलीची स्वप्नं, तिचा संघर्ष, आणि जिद्दीनं पुढं जाण्याची तयारी हे सगळं मी कमळीच्या माध्यमातून अनुभवत आहे," असं ती म्हणाली.

5 / 5
"आज ही कथा थेट न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकते आहे,  याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ही केवळ माझी नाही, तर हजारो मराठी मुलींची गोष्ट आहे, जी आता जगभर पोहोचते आहे. आज खरंच वाटतंय जग जिंकण्याची सुरुवात आपल्या मातीपासून होते," अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.