Post Office Best 5 Schemes : पोस्ट ऑफिसच्या या 5 जबरदस्त योजना, तुमच्या पैशांवर मिळेल दमदार परतावा!
पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुमच्या पैशांना सुरक्षिततेसोबत आकर्षक परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे काही योजनांमध्ये करसवलत आणि नियमित उत्पन्नाचाही लाभ मिळतो. नेमक्या कोणत्या योजना आहेत, किती व्याज मिळते आणि कोणासाठी त्या फायदेशीर ठरू शकतात? जाणून घ्या सविस्तर माहिती.

सरकारकडून हमी असलेल्या सुरक्षित गुंतवणुकीच्या पोस्ट ऑफिस योजनांमध्ये सध्या आकर्षक व्याजदर मिळत आहेत. पोस्ट ऑफिसच्या या 5 जबरदस्त योजना तुम्हाला माहित आहेत का? नसतील तर आताच माहिती जाणून घ्या.
सुकन्या समृद्धी योजना 10 वर्षांखालील मुलींसाठी आहे. एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुलींची खाती (जुळ्यांसाठी तीन) उघडता येतात. वर्षाला किमान 250 ते कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतात. सध्या व्याजदर 8.20% आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी आहे. व्याजदर 8.2% असून ते तिमाही दिले जाते. कमाल गुंतवणूक 30 लाख रुपये, मुदत 5 वर्षे आणि कलम 80सी अंतर्गत करसूट मिळते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 5 वर्षांची सुरक्षित योजना आहे. व्याजदर 7.7% (वार्षिक चक्रवाढ) आहे. किमान 1,000 रुपये, कमाल मर्यादा नाही आणि 80सी अंतर्गत करसूट मिळते.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना नियमित मासिक उत्पन्नासाठी उपयुक्त आहे. व्याजदर 7.4% असून सिंगल खात्यात कमाल 9 लाख, संयुक्तमध्ये 15 लाख रुपये गुंतवता येतात. मुदत 5 वर्षे आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) दीर्घकालीन करमुक्त वाढीसाठी उत्तम आहे. व्याजदर 7.1% (वार्षिक चक्रवाढ) आहे. वर्षाला 500 ते 1.5 लाख रुपये जमा करता येतात. मुदत 15 वर्षे आणि संपूर्ण रक्कम करमुक्त असते.
अधिक अचूक माहिती आणि अर्जासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या किंवा India Post च्या अधिकृत संकेतस्थळावर तपासा.