
पोस्ट ऑफिसची SCSS पूर्णपणे सरकारी गॅरेंटीची स्कीम आहे. म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित आहेत. स्टॉक्स किंवा म्यूचुअल फंड प्रमाणे या स्कीममध्ये मार्केट रिस्क नाहीय. वृद्ध लोक, रिटायरमेंट नंतर कुठल्याही चिंतेशिवाय फिक्सड इनकम हवं असेल, तर ही स्कीम पूर्णपणे सुरक्षित आहे.

या स्कीममध्ये 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक गुंतवणूक करु शकतात.पती-पत्नी जॉइंट अकाउंटमध्ये 60 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करु शकतात. सिंगल अकाउंटमध्ये 30 लाख गुंतवणूकीची सीमा आहे. कमीतकमी 1,000 रुपयापासून सुरुवात करु शकता. योजनेत 5 वर्षाचा कार्यकाळ आहे,जो तुम्ही अजून 3 वर्षांसाठी वाढवू शकता.

SCSS गुंतवणूकीवर वर्षाला 8.2% वार्षिक व्याज मिळतं. उदाहरण म्हणून, जर तुम्ही 15 लाख रुपये गुंतवले, तर वर्षाला जवळपास 1.23 लाख रुपये व्याज मिळेल. 12 महिन्यात त्याची विभागणी केली तर 11,750 रुपये नियमित पेन्शन होते. ही रक्कम मार्केटच्या चढ-उतारापासून सुरक्षित आहे.

SCSS अकाउंट तुम्ही आरामात कुठलही पोस्ट ऑफिस किंवा रजिस्टर्ड बँकेत उघडू शकता. यासाठी आधार, पॅन, फोटो आणि गुंतवणूकीचा सोर्स दाखवावा लागतो. व्याज क्वार्टरली थेट बँक खात्यात जमा होतं. में तुम्ही हवं तर रीइन्वेस्ट सुद्धा करु शकता. 5 वर्षांपूर्वी पैसे काढण्यावर किरकोळ दंड होता.

SCSS त्या वुद्धांसाठी आदर्श आहे, ज्यांना कुठल्याही रिस्कशिवाय फिक्स्ड इनकम हवं आहे. PF आणि ग्रॅच्युटीचा पैसा इथे टाकून तुम्ही दीर्घकाळासाठी वित्तीय सुरक्षा सुनिश्चित करु शकता. यामुळे महागाई आणि दैनिक खर्चाची चिंता कमी होते. दर महिन्याला बँक खात्यात नियमित रक्कम जमा होत असल्याने आरामदायक जीवन जगू शकता.