
पीपीएफविषयी अनेक ग्रह आहेत. काहीजण या योजनेकडे केवळ कर वाचवणे आणि आयुष्याची संध्याकाळ सुखात घालवण्याचा पर्याय म्हणून पाहतात. काहींचे मते ही थोडाबहुत रक्कम या योजनेत टाकलेली काय वाईट. पण ही योजना पण संपत्ती वाढवणारी आहे. Wealth Creation टूल आहे. या माध्यमातून तुम्ही 2 कोटींपेक्षा अधिकचा फंड तयार करू शकता.

PPF मध्ये वार्षिक जास्तीत जास्त 1.5 लाखांची गुंतवणूक करता येते. या योजनेवर सध्या 7.1 टक्के व्याज मिळते. ही रक्कम 15 वर्षांत परिपूर्ण होते. मॅच्युर होते. पण 15 वर्षानंतर गुंतवणूक सुरू ठेवल्यास मोठा फायदा होतो.

कम्पाऊंडिंग ही पीपीएफची खरी ताकद आहे. पीपीएफ खाते म्यॅचुअर झाल्यावर 5-5 वर्षाच्या टप्प्यात त्याला मुदतवाढ देता येते. त्यातून तुम्हाला मोठा फायदा मिळतो.

जर तुम्हाला शेअर बाजारात दीर्घकाळ टिकून राहायचे असेल तर प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि उद्योगपती वॉरेन बफे यांनी युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत. बफे यांचे हे गोल्डन रुल्स तुम्हाला नक्की यश मिळवून देतील.

1.5 लाख रुपये दर वर्षी अशी 15 वर्षे गुंतवणूक केल्यास 22.5 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. त्यावर सध्याचा व्याज दर 7.1 टक्क्यांप्रमाणे 18,18,209 रुपयांचे व्याज मिळले. मॅच्युरिटी रक्कम 40,68,209 रुपये असेल.

या गुंतवणुकीला 4 वेळा मुदत वाढ द्यावी लागेल. म्हणजे 35 वर्षांकरीता गुंतवणूक चालू ठेवावी लागेल. 35 वर्षांपर्यंत 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक ठेवावी लागेल. म्हणजे तुम्ही एकूण 52,50,000 रुपयांची गुंतवणूक कराल. त्यावर 7.1% व्याजदराने 1,74,47,857 रुपये व्याज मिळेल. म्हणजे तुम्हाला एकूण 2,26,97,857 रुपये मिळतील. या व्याजदराने 2 कोटींहून अधिकची रक्कम तुम्हाला मिळेल.