Prajakta Mali: प्राजक्ता मंदिरात जिन्स आणि टॉप का घालून गेली? फोटो शेअर करत सांगितली संपूर्ण स्टोरी

Prajakta Mali: प्राजक्ता माळीला मंदिरात जीन्स घालून गेल्यामुळे ट्रोल केले जात आहे. पण प्राजक्ताने ती जिन्स का घालून गेली होती? या मागचे कारण सांगितले आहे.

| Updated on: Oct 27, 2026 | 7:38 AM
1 / 5
सध्या सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच चर्चेत आहे. प्राजक्ताने एका मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ताने मंदिरात जिन्स आणि टी-शर्ट घातल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. पण प्राजक्ताने तू अशा लूकमध्ये मंदिरात का गेली? हे देखील सांगितले आहे.

सध्या सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच चर्चेत आहे. प्राजक्ताने एका मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ताने मंदिरात जिन्स आणि टी-शर्ट घातल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. पण प्राजक्ताने तू अशा लूकमध्ये मंदिरात का गेली? हे देखील सांगितले आहे.

2 / 5

प्राजक्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये तिने जिन्स घालून जाण्यामागचे कारण देखील सांगितले आहे.

3 / 5

प्राजक्ता राजस्थानच्या पुष्कर मंदिरात गेली आहे. तेथील फोटो शेअर करत प्राजक्ताने "हे आधी ठरवलेलं नव्हतं, पण हे करण्यासाठी मला चोरून बाहेर पडावं लागलं... (म्हणूनच मी जीन्स घातली होती.)" असे कॅप्शन दिले आहे.

4 / 5

"जगत् पिता ब्रह्मा मंदिर - पुष्कर, राजस्थान. सबंध जगात ब्रह्माजींची खूप कमी मंदिरे आहेत, हे सर्वात प्रसिद्ध. ब्रह्मदेवाने आपल्या मंत्रोच्चाराने एक स्त्री निर्माण केली. तीला वाणी, बुद्धी, वेदांचं सामर्थ्य दिलं. जगातील सर्व मनुष्यांच्या जीभेवर सदैव नृत्य करशील असा आशीर्वाद दिला. ती इतकी सुंदर निपजली की जेव्हा ती प्रकटली तेव्हा स्वतः ब्रह्मदेव तिच्यावर भाळले" असे प्राजक्ताने कॅप्शन दिले होते.

5 / 5

पुढे ती म्हणाली की, "स्वतः जन्म दिलेल्या मुलीवर भाळले म्हणून भगवान शिवानं त्यांना शाप दिला की पृथ्वीवर त्यांना कोणी पूजणार नाही. पुणे विद्यापीठात नृत्यांचं शिक्षण घेत असताना 'सरस्वती कौतूकम्' मध्ये ही कथा मी सादर करायचे, त्याची आज खूप आठवण आली. एका उःशापामुळे पुष्करमध्ये हे मंदिर स्थित आहे. असं म्हटलं जातं."

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us