
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. अनेक कार्यक्रमांना प्राजक्ता ही साडी नेसलेली दिसते. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने साडी लूकमध्ये अनकम्फर्टेबल झाल्याचे सांगितले आहे.

प्राजक्ताने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एका इव्हेंटमध्ये फजिती झाल्याचे सांगितले आहे.

'स्टायलिशने मला एक साडी दिली होती. ती साडी खूप बोल्ड होती. त्या साडीवरचा ब्लाऊज तर खूपच छोटा होता. ब्लाऊज मोठा कर असे मी त्या स्टायलिस्टला सांगितले होते. त्यावर ती म्हणाली की मी आधीच कल्पना दिली होती. मी जेव्हा तो ब्लाऊज घातला तेव्हा मला लक्षात आले की मी तो कॅरी करु शकणार नाही' असे प्राजक्ता म्हणाली.

प्राजक्ताने तो ब्लाऊस उसवला आणि त्याची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला होता. पण तिचा तो प्रयत्न फसला. मग तिने पुन्हा तो ब्लाऊज होता तसा केला.

पुढे प्राजक्ताने तो लूक अनकम्फर्टेबल असल्याचे सांगितले. 'तसा तो लूक बोल्ड होता. मी त्याच लूकमध्ये रेड कार्पेटवर गेले. कारण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. मी त्या साडीमध्ये बोल्ड दिसली असणार मला माहिती आहे. पण मी अजिबात तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही' असे प्राजक्ता म्हणाली.