
मराठी मनोरंजन विश्वातील गोड-गोजिरी अभिनेत्री अर्थात प्राजक्ता माळी आपल्याला नवनवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात सुंत्रसंचलनाची भूमिका साकारत आपल्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या नवनवीन अंदाजात दिसतेय.

आता प्राजक्तानं सुंदर ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय.

या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

लवकरच ‘लक-डाऊन’ या चित्रपटातून प्राजक्ता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.