370ची बिर्याणी जोकवर हस हसला, आता रडण्याची वेळ! त्या जोकवरुन प्रणीत मोरेचा नवा व्हिडीओ चर्चेत, थेट सर्वांसमोर…

Pranit More: सध्या सोशल मीडियावर कॉमेडीयन प्रणीत मोरेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रणीत मोरे सर्वांची माफी मागताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

| Updated on: Jun 13, 2026 | 11:35 AM
1 / 5
बिग बॉस 19मधून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला कॉमेडीय प्रणीत मोरे हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्या प्रणीत मोरे त्याच्या वादग्रस्त जोकसाठी चांगलाच चर्चेत आहे. प्रणीत मोरेचे देशभरात अनेक ठिकाणी शो होत असतात. दरम्यान, एका शोमधील '३७० रुपयांच्या बिर्याणी'चा वाद चांगलाच पेटला आहे. आधी शोमध्ये एका मुलाने 370 रुपयांच्या बिर्याणीच्या जोकवर प्रणीत मोरे हस हसला. आता त्याच्यावर अक्षरश: रडण्याची वेळ आली आहे. प्रणीतने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे.

2 / 5

प्रणितने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो जाहिर माफी मागताना दिसत आहे.

3 / 5

व्हिडीओमध्ये प्रणीत बोलत आहे की, नमस्कार, मी हे गेल्या काही दिवसांपासून बोलायचे होते पण माझे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. तुम्ही सगळ्यांनी माझा एक व्हिडीओ पाहिला असेल. हा व्हिडीओ पाहून अनेकजण राग व्यक्त करत आहेत. पण तुमचा हा राग योग्य आहे. कारण त्या मुलाशी जेव्हा मी बोलत होतो तेव्हा त्याने अनेक अपमानजनक वक्तव्य केली. सर्वजण त्याच्यावर हसत होते. मी पण तेच केले. मी निर्णय घेण्यात चूक केली आणि मला वाटते ही माझी सर्वात मोठी चूक आहे. मी त्याला तेथेच थांबवायला हवे होते आणि स्टँड घ्यायला हवा होता. पण मी असे केले नाही.

4 / 5

व्हिडीओमध्ये पुढे तो म्हणाला, मी त्या मुलाला एक प्लॅटफॉर्म दिला ज्यामुळे या सर्व गोष्टी आणखी वाढल्या. ज्यांच्या या गोष्टीमुळे भावना दुखावल्या गेल्या मी त्यांची माफी मागतो. माझ्या विरोधात जी काही कारवाई करण्यात आली आहे त्यासाठी मी सहकार्य करतोय. पण माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की कृपया मला एक संधी द्या. मी सर्व बदलण्याचा प्रयत्न करेन.

5 / 5

प्रणीत मोरेने शेवटी म्हटले की, मी स्वत:वर देखील काम करेन. मी माझ्या कंटेन्टवर देखील काम करेन. तुम्ही या गोष्टींमध्ये भविष्यात देखील सुधारणा पाहाल. मी निश्चितपणे स्वतःला एक चांगला माणूस म्हणून सिद्ध करेन.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us