
प्रिया बॅनर्जी आणि प्रतीक बब्बर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. शुक्रवारी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2025 रोजी व्हॅलेंटाइन डेला दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं.

प्रतीकच्या मुंबईतील घरीच त्याचा हा लग्नसोहळा पार पडला. प्रिया हिच्यासोबत प्रतीक याचं दुसरं लग्न आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

प्रिया हिच्याबद्दल सांगायचं झाल तर, ती देखील अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये प्रियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण अद्यापही प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करु शकलेली नाही.

प्रिया बॅनर्जीची एकूण संपत्ती सुमारे 2 दशलक्ष डॉलर आहे आणि तिचे मासिक उत्पन्न सुमारे 9 लाख रुपये आहे. विविध मार्गांनी प्रिया कोट्यवधीची माया कमावतेय

सिनेमा आणि वेब सिरीजमधील अभिनय, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कमाई करते. सोशल मीडियावर देखील प्रिया कायम सक्रिय असते.