8 एपिसोड्सची वेब सीरिज, नंबर 1 वर होतेय ट्रेंड; IMDb वर तगडी रेटिंग

प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या हा रोमँटिक ड्रामा धुमाकूळ घालत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाल्यापासून ही सीरिज पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. आयएमडीबीवरही या सीरिजला उत्तम रेटिंग मिळाली आहे.

| Updated on: May 19, 2026 | 1:13 PM
1 / 5
विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्यात नवनवीन कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येतच असतो. नुकताच एक रोमँटिक ड्रामा ओटीटीवर दाखल झाला असून प्रदर्शित झाल्यापासून तो ट्रेंडमध्ये आहे. ही वेब सीरिज भारतात मोठ्या प्रमाणात पाहिली जात आहे. जर तुम्हाला रोमँटिक ड्रामा सीरिज पहायची असेल, तर तुम्ही नक्कीच 'मस्ट वॉच'या यादीत याचा समावेश करू शकता.

2 / 5
या सीरिजचा IMDb वर दहापैकी 8.2 अशी उत्तम रेटिंग मिळाली आहे. या सीरिजचे एकूण आठ एपिसोड्स असून प्रत्येक एपिसोड तुम्हाला खिळवून ठेवेल असा आहे. सोशल मीडियावर नेटकरीसुद्धा या सीरिजचं कौतुक करत आहेत. ही वेब सीरिज कॉलेजमधील लव्ह-स्टोरीवर आधारित आहे.

3 / 5
अत्यंत भिन्न व्यक्तिमत्त्वाचे दोन लोक एका अशा करारामध्ये ओढले जातात, जो त्यांचं आयुष्य बदलून टाकतो, अशी याची कथा आहे. एका बेस्ट सेलर पुस्तकावर आधारित या सीरिजची कथा आहे. ज्या टॉप रेटेड वेब सीरिजबद्दल आम्ही इथे बोलत आहोत, त्याचं नाव 'ऑफ कॅम्पस' असं आहे. एली केनेडीच्या 'द डील' या बेस्ट सेलर पुस्तकावर ही सीरिज आधारित आहे. यामध्ये दोन व्यक्तींमधील अनोखी प्रेमकथा सांगण्यात आली आहे.

4 / 5
या सीरिजची कथा हॅना वेल्स आणि गॅरेट ग्रॅहम यांची आहे. हॅना ही अत्यंत हुशार संगीत विद्यार्थिनी असून गॅरेट हा हॉकीपटू आहे. गॅरेट हा सतत मुलींच्या मागेपुढे फिरणारा असतो आणि हॅनाला हॉकीचा प्रचंड तिरस्कार असतो. परंतु एक डील या दोघांना एकत्र आणते आणि त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. परंतु या प्रेमात त्यांना बऱ्याच चढउतारांचा सामना करावा लागतो.

5 / 5
8 एपिसोड्सची ही वेब सीरिज 13 मे रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून ही सीरिज भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. यामध्ये एला ब्राइट, बेलमोंट कॅमेली, जॉश होस्टन आणि स्टीफन केलिन यांच्या मुख्य भूमिका आहेत. आयएमडीबीवर या सीरिजला दहापैकी 8.2 रेटिंग मिळाली आहे.

Follow Us