Prince Yadav : टीम इंडिया आयर्लंडकडून हरली पण डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादवने रचला इतिहास, फक्त तिसऱ्यांदा असं घडलं
Prince Yadav : भारतीय वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू करताना कमालीची गोलंदाजी केली. फलंदाज म्हणून अशी कामगिरी केली, जी याआधी फक्त दोन भारतीय खेळाडू करु शकले आहेत.

आयर्लंड विरुद्ध टी20 सीरीजमध्ये टीम इंडियाचा 2-0 ने पराभव झाला. या सीरीजच्या शेवटच्या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला डेब्यूची संधी मिळाली. त्याने टी 20 इंटरनॅशनलमध्ये पाऊल ठेवताच एका महत्वाच्या कामगिरीची नोंद आपल्या नावावर केली आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

प्रिन्स यादवने या सामन्यात कमालीचा स्पेल टाकला. त्याने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देत तीन विकेट काढले. तो या सामन्यातील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. (PHOTO CREDIT- GETTY)

फलंदाजी दरम्यान प्रिन्स यादवला एक चेंडू खेळण्याची सुद्धा संधी मिळाली. त्या चेंडूवर त्याने सिक्स मारला. पण टीम इंडियाचा एक रन्सने पराभव झाला. (PHOTO CREDIT- GETTY)

आपल्या टी20 करिअरच्या पहिल्या चेंडूवर सिक्स मारुन प्रिन्स यादवने इतिहास रचला. टी20 इंटरनॅशनल क्रिकेटच्या इतिहासात आपल्या पहिल्याच चेंडूवर सिक्स मारणारा प्रिन्स तिसरा भारतीय फलंदाज आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

प्रिन्स यादवच्या आधी सूर्यकुमार यादव आणि रमनदीप सिंह यांनीच टी20 इंटरनॅशनल क्रिकेट करिअरची सुरुवात करताना सिक्स मारला आहे. गोलंदाज म्हणून अशी कामगिरी करणारा प्रिन्स यादव पहिला भारतीय खेळाडू आहे. (PHOTO CREDIT- GETTY)