
मोबाइल रिपेअर करायला देताना अनेकजण त्यांचा डेटा सुरक्षित ठेवायला विसरतात. या कारणामुळे अनेकदा लोकांचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ लीक होतात. असंच काहीसं एका रेडिट युजरसोबत घडलंय. या युजरने तिचा फोन रिपेअर करण्यासाठी दिला होता.

रिपेअर करणाऱ्यानेच तिचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ लीक केल्याचा धक्कादायक आरोप संबंधित पीडित महिलेनं केला. हे व्हिडीओ लीक झाल्यानंतर तिला अनेकांचे अश्लील मेसेज येऊ लागले होते. तिचे कुटुंबीयसुद्धा तिच्याशी बोलणं टाळत होते.

अशी घटना कोणासोबतही घडू शकते. या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. जेव्हा कधी तुम्ही एखाद्या सर्व्हिस सेंटर किंवा शॉपमध्ये फोन रिपेअरसाठी देतात, तेव्हा तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काही काळजी घ्यावी लागते.

अनेक फोन्समध्ये सध्या फोन क्लोनचा फीचर उपलब्ध असतो. जर तुम्ही सेटिंगमध्ये हा फिचर ऑन केला तर तुमचा खासगी (पर्सनल) डेटा दुसऱ्या स्पेसमध्ये शिफ्ट होतो. सॅमसंग, ओपो आणि इतर अनेक फोन्समध्ये ही सुविधा असते. परंतु याशिवाय तुम्हाला फोन रिपेअर करायला देताना मायक्रो SD कार्ड आणि सिम कार्ड काढून घ्यावं लागेल.

तुमचा फोन नेहमी लॉक करून ठेवा, जेणेकरून कोणालाच त्याचा एक्सेस मिळणार नाही. सॅमसंगच्या फोनमध्ये सिक्योर मोड उपलब्ध असतो. हा मोडसुद्धा तुम्ही ऑन करू शकता.

अशा प्रकारे तुम्ही तुमचा डेटा रिपेअर करायला दिल्यानंतरही सुरक्षित ठेवू शकता. तुम्ही हा डेटा गुगल ड्राइव्हमध्ये ट्रान्सफर करून फोनला फॅक्ट्री रिस्टोर करू शकता.