या 15 वर्षांत अडखळलो, पण कधीच..; प्रिया बापटसाठी उमेश कामतची पोस्ट, लग्नाबद्दल म्हणाला..

लग्नाच्या 15 व्या वाढदिवसानिमित्त उमेश बापटने प्रियासाठी खास पोस्ट लिहिली आहे. पंधरा वर्षांच्या सहजीवनाचा हा खास टप्पा त्यांच्या चाहत्यांसाठीही आनंदाचा क्षण ठरला आहे.

| Updated on: Oct 06, 2026 | 2:05 PM
1 / 6
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय आणि लाडकी जोडी म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. दोघंही आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मात्र, पडद्यावरील त्यांच्या अभिनयाइतकंच त्यांचं खासगी आयुष्यही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतं.

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय आणि लाडकी जोडी म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. दोघंही आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मात्र, पडद्यावरील त्यांच्या अभिनयाइतकंच त्यांचं खासगी आयुष्यही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतं.

2 / 6

नुकतंच या दोघांनी आपल्या लग्नाचा 15वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त उमेशने पत्नीसोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उमेश कामतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रिया बापटसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.

3 / 6

या फोटोंसोबत त्याने लिहिलेल्या शब्दांमधून त्यांच्या पंधरा वर्षांच्या सहजीवनाची झलक पाहायला मिळते. उमेशने आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रियाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नात्याबद्दल लिहिताना उमेश म्हणतो की, या 15 वर्षांनी त्यांना आयुष्याबद्दल आणि एकमेकांबद्दल खूप काही शिकवलं.

4 / 6

या प्रवासात दोघांनी एकत्र वाढत, शिकत आणि अनेक चढ-उतारांचा सामना केला. काही वेळा ते अडखळले, तर काही प्रसंगी मनमुराद हसले. मात्र, काळाने घेतलेल्या प्रत्येक परीक्षेत त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही.

5 / 6

काळाच्या प्रत्येक कसोटीत आम्ही एकमेकांची साथ धरली आणि नेहमीच एकमेकांना आधार दिला, असं उमेशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. म्हणजेच आयुष्यात कितीही आव्हानं आली, तरी एकमेकांचा हात घट्ट पकडून दोघांनी हा प्रवास सुरू ठेवला, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.

6 / 6

उमेश आणि प्रिया हे केवळ पती-पत्नी नाहीत, तर एकमेकांचे चांगले मित्र आणि विश्वासू साथीदारही आहेत. भविष्यातही एकमेकांचे विश्वासू व्यक्ती, मित्र, सहकारी, सहनिर्माते आणि ट्रॅव्हल बडी म्हणून हा प्रवास सुरू ठेवण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. 15 वर्षांचा संसार पूर्ण झाल्यानंतरही आपण एकमेकांचीच निवड करत आहोत, ही भावनाही त्याने व्यक्त केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us