
'पवित्र रिश्ता' या मालिकेत अंकिता लोखंडेची ऑनस्क्रीन बहीण साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं. वयाच्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून तू कर्करोगाशी झुंज देत होती. प्रियाने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलंय.

अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपला सात वर्षांनंतर पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली होती. 2018 मध्ये ताहिराला पहिल्यांचा कॅन्सरचं निदान झाल होतं. ही झुंज यशस्वी झाल्यानंतर आता एप्रिल 2025 मध्ये पुन्हा तिला कॅन्सर झाला आहे.

'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करला दुसऱ्या स्टेजच्या लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. पोटातील तीव्र वेदनेनंतर दीपिकाला तपासणीत ट्युमर असल्याचं आढळलं. नंतर हाच ट्युमर कॅन्सरचं असल्याचं निष्पन्न झाल्यावर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

अभिनेत्री रोजलिन खानलाही ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. यासाठी तिच्यावर 19 राऊंड कीमोथेरपी करण्यात आली. त्यानंतर आता पुढील दहा वर्षांपर्यंत तिला ओरल हार्मोनल थेरपी घ्यावी लागणार आहे. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली होती.

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानलाही तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. फेब्रुवारी 2025 मध्ये तिच्यावरील कीमोथेरपी आणि सर्जरी पूर्ण झाली होती.

एप्रिल 2022 मध्ये अभिनेत्री छवी मित्तलला ब्रेस्ट कॅन्सर झालं होतं. सुरुवातीच्या स्टेजमध्येच निदान झाल्याने तिला उपचाराद्वारे त्यावर मात करणं शक्य झालंय. उपचारानंतर होणाऱ्या साइड इफेक्ट्ससाठी ती सध्या हार्मोन थेरपी घेत आहे.

अभिनेत्री शगुफ्ता अली यांनाही कॅन्सरचा सामना करावा लागला. शगुफ्ता यांना तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाला होता. यावर मात करण्यासाठी त्यांनाही बराच संघर्ष करावा लागला. बऱ्याच उपचारानंतर त्यांनी कॅन्सरवर मात केली आहे.

'निशा और उसके कजिन्स' या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता विभू राघवचं कॅन्सरने निधन झालं. त्याला चौथ्या स्टेजच्या कोलन कॅन्सरचं निदान झालं होतं. हा कॅन्सर त्यांच्या शरीरात पसरला होता.