भल्या पहाटे कब्रिस्तानात भयंकर प्रकार, लटकलेल्या अवस्थेत दिसलं असं काही की….दृश्य पाहून सगळीकडे खळबळ!

सध्या पुण्यातील भोर येथून भयंकर प्रकार समोर आला आहे. इथे भल्या पहाटे दफणभूमीत अजब खळबळजनक गोष्ट घडली आहे. याचा तपास आता पोलीस करत आहेत.

| Updated on: Oct 09, 2025 | 6:54 PM
1 / 5
 पुणे–सातारा महामार्गालगतच्या सारोळे (ता. भोर) गावातील मुस्लीम धर्मियांसाठी असलेल्या दफनभूमी (कब्रस्तान) परिसरात अजब प्रकार समोर आला आहे. भल्या पहाटे दफनभूमी परिसरातील दृश्य पाहून लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार या दफनभूमी परिसरात एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 9 ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

3 / 5
मृत युवकाचे नाव इर्शाद शेख (वय अंदाजे 38, रा. पांडे, ता. भोर) असे आहे. स्थानिक नागरिकांनी सकाळच्या सुमारास दफनभूमीच्या परिसरात गळफास घेतलेला मृतदेह पाहून तत्काळ राजगड पोलिसांना याची माहिती दिली.

4 / 5
माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा युवक काही दिवसांपासून मानसिक तणावात होता.

5 / 5
तरीदेखील आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे सरोळे, पांडे आणि आसपासच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी या घटनेविषयी दुःख व्यक्त करत पोलिसांकडे आत्महत्येच्या कारणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.