फक्त 3 सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं, इंद्रायणी नदीचा पूल कसा कोसळला? बचावलेल्या पर्यटकाने सगळं सांगितलं!

पुण्यातील इंद्रायणी नदीवर मोठा अपघात झाला आहे. या पूल कोसळल्यामुळे पर्यटक नदीत वाहून गेले आहेत.

| Updated on: Jun 15, 2025 | 9:09 PM
1 / 7
पुण्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील पूल तुटल्याने 30 पेक्षा जास्त लोक वाहून गेले होते. यातील बऱ्याच पर्यटकांना बचाव पथकांने बाहेर काढलं आहे.

2 / 7
तर या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे. दरम्यान आता या दुर्घटनेत बचावलेल्या एका पर्यटकाने दुर्घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे.

3 / 7
अवघ्या तीन सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं, असं या पर्यटकाने म्हटलं आहे.

4 / 7
इंद्रायणी नदीच्या दुर्घटनेत गणेश पवार नावाची व्यक्ती सुदैवाने बचावली आहे. त्यांनी पूल नेमका कसा कोसळला? याची सविस्तर माहिती दिली आहे. या दुर्घटनेत माझी दुचाकी वाहून गेली, असं त्यांनी म्हटलंय.

5 / 7
तसेच हा अपघात अवघ्या दोन ते तीन सेकंदांत घडला. पूल कोसळत असताना मी एका ठिकाणी पकडले. त्यामुळे सुदैवाने मी वाचलो, अशी माहिती गणेश पवार यांनी दिली.

6 / 7
तसेच, आमचं या पुलावरून रोज येणं-जाणं असतं. हा पूल जीर्ण झालेला आहे. हा पूल पूर्णपणे वाकलेला होता. हा पूल मधोमध पडला आहे, असं गणेश पवार यांनी सांगितलं.

7 / 7
दरम्यान, या दुर्घटनेमुळे वाहून गेलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या परिसरात रुग्णवाहिका आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य केले जात आहे.