तिला संपवलं, रात्रभर मृतदेहाजवळ बसला, सकाळी…प्रेयसी संशय घ्यायची म्हणून थेट खून; पुणे हादरलं!

याच वादातून शुभमने कोमलला डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कोमलचा मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर शुभम रात्रभर कोमलच्या मृतदेहाशेजारी बसून होता.

| Updated on: Nov 23, 2026 | 9:07 PM
1 / 5
पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीत प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोमल डहाळे आणि शुभम कालबांडे हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते.

पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीत प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोमल डहाळे आणि शुभम कालबांडे हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते.

2 / 5

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते एकत्र राहत होते. दोघांच्या लग्नालाही कुटुंबीयांची संमती होती. मात्र, शुभमचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

3 / 5

याच वादातून शुभमने कोमलला डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कोमलचा मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर शुभम रात्रभर कोमलच्या मृतदेहाशेजारी बसून होता.

4 / 5

सकाळी त्याने स्वतः 112 क्रमांकावर फोन करून हत्येची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कोमलला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

5 / 5

या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी शुभमला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीचे खरंच दुसरीकडे प्रेमसंंबंध होत का? हे तपासात स्पष्ट समोर येण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us