
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. त्यानंतर पुणेकरांसाठी मेट्रो सुरु झाली. पुणे मेट्रोसंदर्भात सर्वांना चांगलेच कुतूहल होते. बच्चे कंपनी मेट्रो पाहून हरखून गेले होते.

बच्चे कंपनीप्रमाणे पुणेकरांना मेट्रोचे चांगलेच आकर्षण होते. मेट्रोजवळ युवक, युवती सेल्फी घेण्यात मग्न होते. गेल्या दोन दिवसांत ४० हजार पेक्षा जास्त पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास केला.

मेट्रो पुणेकरांच्या पसंतीस उतरली. मेट्रोचे दोन मार्ग सुरु झाले. यामुळे पिंपरी चिंचवड ते पुणे शिवाजीनगर हे अंतर कमी वेळेत गाठणे शक्य झाले. यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली.

पुणे शहरात आतापर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमटी बसेसचा पर्याय होता. परंतु या बसने प्रवास करताना वाहतूक कोंडीत वेळ जास्त जात होता. परंतु मेट्रोतून आता २५ ते ३० मिनिटांत पुणे ते पिंपरी चिंचवड गाठता येत आहे.

मेट्रो सुरु झाल्यामुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची चांगली सेवा मिळत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. यामुळे वाहतूक कोंडी नाही, प्रदूषण नाही, कमी खर्चात वेगवान प्रवास होत आहे.