Pune Bus Rape Case: तरुणीवर अत्याचार, पोलिसांनी आरोपीलं कसं घेतलं ताब्यात? ‘हे’ थरारक फोटो पाहून म्हणाल…

Pune Bus Rape Case: बुधवारी पुणे स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने पीडितेला जीवेमारण्याची धमकी दिली आणि तो फरार झाला. पण 72 तासांनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 37 वर्षीय आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला शिरूर, पुणे येथून अटक करण्यात आली आहे.

| Updated on: Feb 28, 2025 | 12:01 PM
1 / 5
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. स्वारगेट पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच अंदाजे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ऑपरेशनमद्ये होते. तीन दिवसापासून स्थानिक नागरिकांची देखील पोलिसांना मदत मिळाली.

2 / 5
पोलिसांचे डॉग स्क्वॉडने वेगवेगळ्या ठिकाणी गेले. उसाच्या शेतं श्वानाने दाखवलं होतं. ड्रोनचा वापर करून आरोपी ट्रेस झाला आणि गुरुवारी 1 वाजून 10 मिनिटांनी आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं.

3 / 5
अखेर आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रात्री दीडच्या सुमारास आरोपीला बेड्या ठोकल्या.

4 / 5
पुणे अत्याचार प्रकरणात 40 जणांची चौकशी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षिस देखील घोषित करण्यात आलं होतं.

5 / 5
सध्या या प्रकरणी पोलीस  कसून चौकशी करत आहेत. शिवाय आज आरोपीला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणी  पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.