इंद्रायणीचा पूल दुर्घटनेमागचं टेक्निकल कारण काय? ‘या’ एका चुकीमुळे सगळं उद्ध्वस्त! चूक कुणाची?

पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या पुलाच्या दुर्घटनेत अनेकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. दोघांचा यामध्ये मृत्यूही झाला आहे.

| Updated on: Jun 15, 2025 | 6:09 PM
1 / 5
पुण्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेत  दोघांचा मृत्यू झाला आहे.

2 / 5
 दरम्यान, या पुलाच्या अपघातस्थळी आमदार सुनिल शेळके पोहोचले आहेत. त्यांच्या उपस्थितीत बचावकार्य केले जात आहे. त्यांनीच एक चूक टळली असती तर दुर्घटना झाली नसती असं सांगितलंय.

3 / 5
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर 32 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जण गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

4 / 5
 राज्य सरकार, प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहे. या पुलावरून जाण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घालून दिले होते. पाचदारी पुलावरून स्थानिक लोकांनी दुचाक्या नेल्या नसत्या तर ही घटना टळली असती असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी दिलीय.

5 / 5
एखाद्या ठिकाणी निर्बंध घातले असतील किंवा फलक लावले असतील तर अशी व्यवस्था तोडून जाणे चुकीचे आहे. अशा स्थितीत प्रशासनाने नेमके काय केले पाहिजे? असा सवालही शेळके यांनी केला.