
अल्लू अर्जुन

श्रीवल्लीची भूमिका साकारलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचीसुद्धा प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे. तिने या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन स्विकारलं आहे. पुष्पाच्या पहिल्या भागासाठी तिला फक्त 2 कोटी रुपये फी मिळाली होती.

पहिल्या आणि दुसऱ्या भागात खलनायक भंवर सिंहची भूमिका साकारलेला अभिनेता फहाद फासिल याला 8 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. अल्लू अर्जुनसोबत त्याचे ॲक्शन सीन्स चांगलेच गाजले आहेत.

'पुष्पा 2'मध्ये 'किसिक' या गाण्यावर नाचणारी अभिनेत्री श्रीलीला हिला दोन कोटी रुपये मानधन मिळालं आहे. पहिल्या भागात समंथा रुथ प्रभूने 'ऊ अंटावा' या गाण्यासाठी पाच कोटी रुपये मानधन घेतलं होतं.

या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी सीक्वेलसाठी 15 कोटी रुपये मानधन स्विकारलं आहे. पहिल्या भागाचंही त्यांनीच दिग्दर्शन केलं होतं.

पुष्पा आणि पुष्पा 2 मधील गाणी तुफान हिट ठरली आहेत. देवी श्रीप्रसाद यांनी गाण्यांना दमदार संगीत दिलं आहे. 'पुष्पा 2'साठी त्यांना 5 कोटी रुपये मानधन मिळालं आहे.