
राहू आणि केतू हे ग्रह नक्षत्र बदलणार आहेत. या दोन्ही ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यावर परिणाम होईल. या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह मानले जाते. त्यांच्या गोचरामुळे सर्वांवरच काही ना काही परिणाम होणार आहे. पण 3 राशींसाठी राहू-केतूचे नक्षत्र परिवर्तन विशेष ठरणार असून त्यांना खूप चांगले लाभ मिळतील. हे दोन्ही ग्रहांचे गोचर 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 23 नोव्हेंबरला सकाळी ठीक 9 वाजून 29 मिनिटांनी राहू शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि केतूही त्याच वेळी पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सध्या राहू कुंभ राशीत तर केतू सिंह राशीत आहे.

कर्क राशीच्या कुंडलीत राहू-केतू दहाव्या भावात आहेत. राहूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे कर्क राशीवाल्यांच्या करिअर क्षेत्रात मोठे बदल घडतील. तुम्हाला बढती मिळू शकते, मान-सन्मान वाढेल. केतूचा गोचर तुमच्यासाठी उत्तम ठरेल, तो तुम्हाला भरपूर पैसे कमावण्याची संधी देईल. कौटुंबिक संबंध गोड राहतील. तसेच तुमची प्रगती होईल. अनेक चांगल्या गोष्टी घडण्यास सुरुवात होईल. त्यामुळे येता काळ कर्क राशींसाठी चांगला आहे

तुमच्या लग्न भावात राहू आणि सातव्या भावात केतू आहे. कुंभ राशीवाल्यांना राहू-केतूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे विशेष लाभ मिळेल. आयुष्यात आनंद वाढेल. पैशांची बचत करता येईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. एकंदरीत काळ चांगला राहील. तरीही राहू मायावी ग्रह असल्याने तो भ्रम आणि अस्थिरता वाढवू शकतो, म्हणून थोडे सावध राहावे लागेल. भ्रमात येऊन उगाच कोणते काम करु नये.

मिथुन राशीच्या तिसऱ्या भावात हे गोचर होणार आहे. तुमच्यासाठी हा काळ अनुकूल राहील आणि अपार यश मिळेल. मेहनत आणि प्रामाणिकपणे काम केल्यास खूप लाभ होतील. एखादे अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. तसेच तुमचे अडकलेले पैस देखील तुम्हाला परत मिळतील. आरोग्य उत्तम राहील, प्रवासाचे योग येतील. करिअरमध्ये प्रगती होईल आणि मान-सन्मान वाढेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)