
तिकडे दिल्ली राहुल गांधींची तीन दिवस ईडीने चौकशी केली आणि इकडे राज्यात आजही काँग्रेस रस्त्यावर उतरली.

यावेळी शेकडो कार्यकर्ते काँग्रेसच्या या आंदोलनात सहभागी झाले होते.

बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक बडे नेते या मोर्च्यात दिसून आले.

या मोर्चावेळी केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप करत, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली.

पोलिसांनी काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेलं.

मोदी सरकारच्या या दडपशाहीविरोधात काँग्रेसचा विरोध हा सुरूच राहणार असा इशारा यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.

तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी हे मोदी सरकारच्या दडपशाहीला पुरून उरतील, अशी प्रतिक्रियाही यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिली आहे.