राहुल गांधींची फक्त वर्षभराची कमाई इतकी; संपत्तीचा आकडा एकदा पहाच!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे, याबद्दल जाणून घेऊयात.. शेअर बाजार, सोन्याचे बाँड्स इत्यादी गोष्टींमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. याशिवाय त्यांच्या संपत्तीत आणखी काय काय आहे, ते सविस्तर वाचा..

| Updated on: Feb 16, 2026 | 4:17 PM
1 / 5
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकूण मालमत्तेची माहिती दिली होती. त्यानुसार राहुल गांधींनी त्यांची एकूण संपत्ती 20.39 कोटी रुपये घोषित केली होती. 2019 मध्ये हा आकडा 15.88 कोटी रुपये होता. म्हणजेच पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत 5 कोटींची वाढ झाली.

2 / 5
या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत राहुल गांधी यांचं एकूण उत्पन्न अंदाजे 6 कोटी रुपये आहे. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा वाटा गुंतवणूक आणि इतर स्रोतांमधून येतो. राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे फक्त 55 हजार रोख रक्कम असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या दोन बँक खात्यांमध्ये 26.25 लाख रुपये जमा आहेत.

3 / 5
राहुल गांधी यांनी 25 कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी केले आहेत, ज्यांचं एकूण मूल्य 4.33 कोटी रुपये आहे. हे त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा एक महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय सात म्युच्युअल फंडांमध्ये त्यांनी 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

4 / 5
राहुल गांधी यांच्याकडे सुमारे 15 लाख रुपयांचे सोन्याचे बाँडदेखील आहेत. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे विमा पॉलिसीमध्ये 61.52 लाख रुपयांच्या ठेवी, 4.20 लाख रुपयांचं सोन आणि इतर दागिने आहेत. त्यांची एकूण जंगम मालमत्ता 9.24 कोटी रुपयांची आहे.

5 / 5
राहुल गांधी यांनी 11.15 कोटी रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये दिल्लीतील मेहरौली इथल्या सुलतानपूर गावातील शेतजमिनीचा समावेश आहे. ही शेतजमीन त्यांनी बहीण प्रियांका गांधींसोबत मिळून खरेदी केली होती. माझ्या नावावर कोणतंही वाहन नोंदणीकृत नाही, असं राहुल गांधी यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.