Rahul Mahajan: 3 लग्न मोडली, वयाच्या 51व्या वर्षी लिव्ह इनमध्ये… आता चौथ्यांदा लग्न करणार राहुल महाजन
Rahul Mahajan: राहुल महाजन हे त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. नुकताच त्यांनी खासगी आयुष्याबाबत केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चौथ्यांदा लग्न करण्याबाबत ते नेमकं काय म्हणाले वाचा...

माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत प्रमोद महाजन यांचे चिरंजीव राहुल महाजन हे कायमच चर्चेत असतात. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. राहुल महाजन यांनी तीन वेळा लग्न केले आहे. आता वयाच्या 51व्या वर्षी ते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात आहेत. राहुल महाजन यांचा तीन वेळा घटस्फोट झाल्यामुळे त्यांचा प्रेम आणि लग्नावरून विश्वास उडाला आहे. पण तरीही ते चौथ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता राहुल महाजन नेमकं काय म्हणाले? वाचा...
उज्ज्वल त्रिवेदी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना ५१ वर्षीय राहुल महाजन यांनी म्हटले की, ते चौथ्यांदा लग्न करू इच्छितात आणि पुढच्या वर्षापर्यंत ते लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांनी म्हटले की, जसजसे त्यांचे वय वाढत जाईल, तसतशी त्यांच्या लग्नाची शक्यता कमी होत जाईल.
राहुल महाजन आपल्या मागील तीन लग्नांच्या तुटण्याचे कारण घाईघाईने घेतलेले निर्णय सांगतात. राहुल महाजन म्हणाले, “म्हणूनच मी लग्न करू इच्छितो. मला वाटते मी एकटाच आहे जो लग्नावर विश्वास ठेवतो. पण यावेळी मी लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहीन. ते आपल्या लेडी लवसोबत ६ महिने किंवा १ वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतरच लग्नाचा निर्णय घेतील. त्यांनी म्हटले की, १-२ वर्ष डेट केल्यानंतरही लग्नाचा विचार करू शकतात.
राहुल म्हणाले, “मी कोणत्या ना कोणत्या नात्यात राहीन, हे नक्की आहे. नाहीतर आयुष्यात खूप एकटेपणा येतो. कोणीतरी हवे जे तुमची जर्नी पाहू शकतील. मला वाटते कोणीतरी माझ्या आयुष्याचा साक्षीदार बनावे. मीही कोणाच्या तरी आयुष्याचा साक्षीदार बनावे.”
राहुल महाजन यांचे मत आहे की, कमी वयात लग्न करणे उत्तम असते. कारण तेव्हा जोडपे एकत्रच पुढे वाढतात, जोडप्याला कळतही नाही की त्यांचे लग्न झाले आहे. त्यांनी म्हटले की, त्यांनी फार कमी लोक पाहिले आहेत ज्यांचे २०-२५ व्या वर्षी लग्न झाले आणि त्यांचे नाते तुटले.