AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Supreme Court Hearing : गुवहाटी मध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत, शिवसेना कोणाची? आजच्या सुनावणीकडे सगळ्या देशाचं लक्ष

Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी प्रतियुक्तीवाद सुरु केला आहे. या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे.

Shivsena Supreme Court Hearing : गुवहाटी मध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत, शिवसेना कोणाची? आजच्या सुनावणीकडे सगळ्या देशाचं लक्ष
Eknath Shinde-Uddhav Thackreray
| Updated on: Nov 25, 2026 | 8:29 AM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता दिली. निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंना दिलं. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. मागच्या तीन वर्षांपासून सातत्याने या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली जात होती. पण ऑगस्ट महिन्यापासून या खटल्याची नियमित सुनावणी सुरु झाली आहे. आधी उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी आपले मुद्दे मांडले. आता पुन्हा ठाकरे गटाकडून प्रतियुक्तीवाद सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत.

“गुवहाटी मध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत. विधिमंडळ पक्ष नेता म्हणून शिंदे हे गुवाहाटी मध्ये बसून हे ठरवू शकत नाही.विधानसभा अध्यक्ष नेमणे, विधिमंडळ नेता निवडणे आणि मुख्यमंत्री निवडणे याला आमचा विरोध आहे” असं युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला. “निवडणूक आयोगाने कोण पक्ष आहे याचा जेव्हा निर्णय दिला ती तारीख महत्वाची आहे. शिंदे हे राजकीय पक्ष हे त्या तारखेपासून आहेत आणि ती तारीख म्हणजे फेब्रुवारी 2023. म्हणजे त्याच्या पूर्वी आम्ही पक्षच होतो ना” असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.

हे बंड ठरवून केलं आहे

“भारत गोगावले यांना व्हीप नियुक्त करणे आणि सुनील प्रभू यांना काढणे हे कोणत्या कायद्यानुसार आहे ? हे ठरवण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे सगळं (फूट) विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी झाली होती. यासाठीची तयारी पूर्वीच झाली होती आणि त्याला भाजपची मदत होती” असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. “हे बंड ठरवून केलं आहे. निवडणूक आयोगाने कधीही आम्हाला नोटीस दिली नव्हती. संघटनेतील कुठल्याही गोष्टी, स्ट्रक्चर निवडणूक आयोगाने पाहिलं नाही. आयोगाने फक्त विधिमंडळ सदस्यांची संख्या पाहून निर्णय घेतला” असं कपिल सिब्बल म्हणाले.

Follow Us
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...