
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडपं राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आज (17 जुलै) त्यांनी आपल्या टेलिव्हिजन जगतातील सर्व मित्रांसाठी एक मोठी पार्टी ठेवली. यात कोण सहभागी झालं होतं याचेच हे खास फोटो.

राहुल वैद्यची जवळची मैत्रीण रश्मी देसाई या पार्टीत आवर्जुन हजर होती. यावेळी अभिनेत्री रश्मी सुंदर लुकमध्ये दिसली. राहुल आणि रश्मी बिग बॉसपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

राखी सावंत या पार्टीत पारंपारीक वेशभूषेत दिसली.

राखी या पार्टीसाठी विकास गुप्तासोबत आली.

या पार्टीत विकास गुप्ता राखी सावंतसोबत चांगलीच मस्ती करताना दिसला.

या नव्या जोडप्याला विश करण्यासाठी अर्शी खान देखील पार्टीत पोहचली.

राहुल वैद्य आणि अर्शी खान एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.